पाकिस्तानी दुतावासासमोर लंडनमध्ये जोरदार निदर्शने   

लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या आणि ज्यू वंशिय नागरिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेध  लंडन यथील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर जोरदार निदर्शने करुन केला. अनेक भारतीयांनी तिरंगा ध्वज आणि निषेधाचे फलक हातात घेतले होते.
 
भारतीय आणि ज्यू समुदायातील पाचशेहून अधिक जण आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी पहलगाम येथील क्रूर हत्यांविरोधात आवाज उठवला. पीडितांना तातडीने न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दहशतवादाविरोधात जागतिक समुदायाने एकत्रित कारवाई करण्याचा आग्रह धरला. कठोरपणे कारवाई केल्याशिवाय दहशतवाद समूळपणे नष्ट होणार नाही, असा त्यांचा सूर होता. 
 
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकांच्या कुटुंबांना न्याय देण्याची मागणी त्यांंनी केली. एक भारतीय म्हणाला, ब्रिटनमधील भारतीय नागरिक घृणास्पद हल्ल्यामुळे चिडले आहेत. निदर्शने केवळ ऐक्य आणि दुःखाचे शांततापूर्ण प्रदर्शन आहे. या आंदोलनात ज्यू वंशिय नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांना कट्टरपंथी इस्लामी दहशतवादापासून धोका आहे. पहलगाममधील हल्ला आणि २०२३ मधील  इस्रायलवरील हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात साधर्म्य आहे. त्यामुळे आम्ही आंदोलनात सहभागी झाले असल्याचे ज्यू वंशिय नागरिकांनी सांगितले.

Related Articles